Ad imageAd image

मनपा 20 कोटींची भरपाई गुरुवारी हायकोर्ट सुनावणीत काय झालं

ratnakar
मनपा 20 कोटींची भरपाई गुरुवारी हायकोर्ट सुनावणीत काय झालं
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनपा 20 कोटींची भरपाई गुरुवारी हायकोर्ट सुनावणीत काय झालं

बेळगाव : भूसंपादन प्रक्रियेसाठी 20 कोटी रुपयांच्या दिलेल्या ठेवीला प्रांताधिकाऱ्यांच्या खात्यात देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने गुरुवारी पर्यंतची मुदत दिली होती त्यावर न्यायालयात काल सुनावणी होती.

सुनावणीसाठी काल मनपा आयुक्त अशोक धुडगुंटी, मनपाचे कायदा सल्लागार महांत शेट्टी हे मनपाच्या वतीने उच्च न्यायालयात हजर झाले. त्यावेळी त्यांनी कोर्टाला प्रतिज्ञा पत्र देऊन रक्कम भरण्यासाठी अवधी मागितला पण न्यायालयाने प्रतिज्ञापत्र आणि रक्कम आगामी 12 सप्टेंबर पर्यंत करा अशा सूचना केल्या.

त्यामुळे महापालिकेला आता 20 कोटी डिपॉझिट करण्यासाठी बारा दिवसांचा अवधी मिळाला आहे .बारा दिवसात महापालिकेला २० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

बँक ऑफ इंडिया ते ओल्ड बीपी रोड या रस्ता रुंदीकरणात झालेल्या जमीन संपादनात 20 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता त्यावरून सध्या बेळगावातील महापालिकेच्या राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे.

गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी महापालिकेला 12 तारखेपर्यंत अवधी मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article