Ad imageAd image

रक्तदानासाठी तुमचा डावा किंवा उजवा हात निवडावा हे कोणत्या आधारावर ठरवले जाते? तज्ज्ञांनी केला खुलासा

ratnakar
रक्तदानासाठी तुमचा डावा किंवा उजवा हात निवडावा हे कोणत्या आधारावर ठरवले जाते? तज्ज्ञांनी केला खुलासा
Close-up of patient with tubes in her arm squeezing the ball in her hand while donating the blood
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रक्तदानासाठी तुमचा डावा किंवा उजवा हात निवडावा कोणत्या आधारावर ठरवले जाते? तज्ज्ञांनी केला खुलासा

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, कारण हे सुरक्षित रक्त एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते. रक्तदान करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. रक्तदान करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. वय वर्ष 18 ते 60 पर्यंत शरीराने तंदुरुस्त व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन 45 किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. रक्तदान केल्यानंतर साधारण 3 महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करू शकता. याबरोबर रक्तदानाविषयी आणखी एक प्रश्न सर्वांच्या मनात येतो तो म्हणजे, रक्तदान करताना विशिष्ट हात वापरतात का? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधला असता, रक्तदानासाठी हात निवडण्या मागील कारण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आणि त्यामुळे दान केलेल्या रक्तामध्ये काही फरक पडतो का याबाबतही खुलासा केला.

“रक्तदान करताना आपण सामान्यत: दोन्ही हात वापरू शकतो. परंतु बहुतेक लोक काही (लिहणे, जेवण करणे, वस्तू उचलणे इ.) व्यावहारिक कारणांसाठी त्यांचा जास्त वापरला न जाणारा हात रक्तदानासाठी वापरतात,” असे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स क्रिटिकल केअरचे हेड कन्सलटंट डॉ. अकलेश तांडेकर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. सोप्या शब्दात, याचा अर्थ असा की, जर एखादी व्यक्ती उजव्या हाताची असेल तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab technician) रक्तदानासाठी डावा हात निवडेल आणि जर एखादी व्यक्ती डाव्या हाताची असेल तर तंत्रज्ञ उजव्या हाताची निवड करेल.

डॉ. तांडेकर यांच्या मते,” गुंता गुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी आणि रुग्णाच्या नेहमी वापरात असलेल्या हातावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी, विशेषत: अनेकदा रक्तदान करण्याची आवश्यकता असल्यास या गोष्टीची काळजी घेतली जाते.
“रक्तदान करताना तुम्हाला अधिक आरामदायी वाटेल तो हात निवडा ,हे  तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थिर राहण्यास मदत करते. ज्यामुळे फ्लेबोटोमिस्ट (रक्त संकलन तज्ज्ञ) यांना शिरा शोधणे सोपे होईल, ”असे आर्टेमिस हॉस्पिटल्सच्या डिपार्टमेंट ऑफ ब्लड सेंटर अँड ट्रान्सफ्युजनचे चेअरपर्सन आणि मेडिकल सर्व्हिस डिपार्टमेंटचे डेप्युटी हेड डॉ.अनिल खेत्रपाल, यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

डॉ. तांडेकर यांच्या मते रक्तदानासाठी हात निवडताना ही कारणे महत्त्वाची असतात
*हालचाल करण्याची पातळी( ॲक्टिव्हिटी पातळी) : महत्त्वाच्या कामांसाठी नेहमी वापरात नसलेला हात वापरल्याने रक्तदानंतर रोजची कामे करताना गैरसोय होत नाही.झटपट आराम मिळतो(पुनर्प्राप्ती): फारसा वापरात नसलेल्या हातावर रक्तदानानंतर कोणतीही जखम किंवा वेदना जाणवत असेल तर त्याचा फार त्रास होत नाही. आपली रोजची कामे करणे शक्य होते.
*चांगली नस : रक्तदानासाठी कोणती नस चांगली आहे हे निश्चित करण्यासाठी परिचारिका किंवा फ्लेबोटोमिस्ट दोन्ही हातांची तपासणी करतील.“कधीकधी, एका हाताला अधिक प्रमुख नसा असू शकतात.
प्रशिक्षित व्यावसायिक रक्तदानासाठी हात निवडताना रक्त दात्याला आराम मिळेल आणि कार्यक्षमता राहता येईल याला प्राधान्य देतात,” असे डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले.
एक हात दुखापतीमुळे प्रभावित झाल्यास रक्तदानासाठी तुमचा दुसरा वापरला जाईल. “अधूनमधून दुसरा हात वापरल्याने एका हाताच्या शिरा बरे होण्यास मदत मिळते. हा निर्णय शेवटी फ्लेबोटोमिस्टच्या मूल्यांकनावर आधारित असेल आणि सर्वोत्तम शिरा असलेल्या हाताची निवड केली जाईल,” असे गुरुग्राम येथील मॅरेंगो एशिया हॉस्पिटल्स्च्या ‘हेमेटोलॉजी अँड बोन मॅरो ट्रान्सप्लांट’चे क्लिनिकल डायरेक्टर डॉ मीत कुमार यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

हाताच्या निवडीचा रक्तदान प्रक्रियेवर परिणाम होतो का?
बहुतेक प्रकरणांमध्ये, तुम्ही ज्या हाताने रक्तदान करता त्याचा रक्तदान प्रक्रियेवर फारसा परिणाम होत नाही, असे डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले. “तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट हाताने यशस्वी रक्तदानाचा इतिहास असल्यास, तुम्ही त्याचा उल्लेख फ्लेबोटोमिस्टकडे करू शकता”.
“आरोग्याच्या कारणास्तव एक हात दुसऱ्या हातापेक्षा चांगला आहे असे सांगणारे कोणतेही विशिष्ट विज्ञान नाही; हे मुख्यतः रक्तदानासाठी सुई शिरेमध्ये प्रवेश करण्यास किती योग्य आहे यावर अवलंबून असते,” असा डॉ. तांडेकर यांनी निष्कर्ष काढला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article