Ad imageAd image

चार खाजगी एफएम रेडिओ चॅनेल बेळगावसाठी मंजूर

ratnakar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 234 नवीन शहरांमध्ये 730 चॅनेल्ससाठी चढत्या ई-लिलावाच्या तिसऱ्या बॅचचे आयोजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, खाजगी एफएम रेडिओ फेज थ्री ची पॉलिसी अंतर्गत अंदाजे आरक्षित किंमत 784.87 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये बेळगावला 4 वाहिन्यांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या 2011 पासून बेळगावसाठी 4

चॅनेल्ससाठी एकच कथा ती म्हणजे त्यांना अजिबात बोली नाही.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वगळून एकूण महसुलाच्या 4 टक्के म्हणून एफएम चॅनेलचे वार्षिक परवाना शुल्क (एएलएफ) आकारण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
हे देशातील 234 नवीन शहरे/नगरांसाठी लागू होईल. सदर 234 नवीन शहरे/नगरांमध्ये खाजगी एफएम रेडिओ रोलआउट होऊन या शहरा/नगरांमधील एफएम रेडिओची अपुरी मागणी पूर्ण करेल. ज्याची अजूनही खाजगी एफएम रेडिओ प्रसारणाद्वारे पूर्तता झाली नव्हती आणि तेथे मातृभाषेत नवीन/स्थानिक सामग्री आणली जाईल.

यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. स्थानिक बोली आणि संस्कृतीला चालना मिळेल आणि ‘स्थानिकांसाठी आवाज’ उपक्रम सुरू होतील. अनेक मंजूर शहरे/नगरे ही आकांक्षी जिल्हे आणि एलडब्ल्यूई प्रभावित भागात आहेत. या भागात खाजगी एफएम रेडिओची स्थापना केल्याने या क्षेत्रांमध्ये सरकारची पोहोच आणखी मजबूत होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article