ऑस्ट्रेलियात ‘पीच ब्लॅक’ नावाचा एका युद्धसराव सुरु आहे. ‘पीच ब्लॅक’च्या मागच्या 43 वर्षातील इतिहासातील हा सर्वात मोठा युद्धा सराव आहे. एकूण 20 देश, 140 विमान आणि 4400 लष्करी सैनिक या युद्धाभ्यासात सहभागी झाले आहेत. युरेशियन टाइम्सने हे वृत्त दिलय. ‘पीच ब्लॅक’ मध्ये विविध देशांचे फायटर पायलट्स आपल हवाई कौशल्य सादर करत आहेत. भारत आणि दक्षिण कोरियाच्या एअर फोर्सने संयुक्त युद्धा सराव केला. अमेरिकन बनावटीच F-15 K आणि भारताच्या सुखोई Su-30 MKI मध्ये सामना झाला. भारताने इंडियन एअर फोर्सच उच्चतम कौशल्य असलेलं 150 जणांच पथक या युद्ध सरावासाठी पाठवलं आहे.
भारताच्या पथकात पायलट, इंजिनिअर्स, टेक्नीशियन्स, कंट्रोलर्स आणि अन्य तज्ज्ञांचा समावेश आहे. Su-30 MKI, C-17 ग्लोब मास्टर आणि IL-78 ही भारताची मोठी विमान हाताळण्याचा अनुभव असलेलं पथक या युद्धभ्यासात सहभागी झालं आहे. फायटर विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यासाठी IL-78 चा वापर होतो. दक्षिण कोरियाने सहा F-15 K आणि 100 जणांच पथक या सरावासाठी पाठवलं आहे.
12 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 असा या सरावाच वेळापत्रक आहे. 24 जुलैला इटालियन एअर फोर्सच युरोफायटर टायफून हवाई कौशल्य दाखवताना अज्ज्ञात कारणामुळे कोसळलं. त्यामुळे व्यत्यय आलेला. पण आता पुन्हा पूर्ववत युद्ध सराव सुरु झाल्याच ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आलय.
या युद्ध सरावात दक्षिण कोरियाच्या F-15 K आणि भारताच्या सुखोई Su-30 MKI ची आकाशात भिडाभीड झाली. यावेळी दोन्ही फायटर जेट्सच्या वैमानिकांनी असामान्य कौशल्याच प्रदर्शन केलं. अशा सरावाची प्रत्यक्ष युद्ध म्हणजे डॉग फाईटच्या वेळी भरपूर मदत होते. वैमानिकांना नवीन डावपेच, कौशल्य शिकता येतं. भारताच्या सुखोई Su-30 MKI ने अमेरिकेच्या F-15 K समोर तोडीसतोड प्रदर्शन केलं. याच सगळं श्रेय भारताच्या फायटर पायलट्सना जातं. Su-30 MKI हे भारताकडे असलेलं रशियन बनावटीचा फायटर विमान आहे. भारताने रशियाकडून परवाना विकत घेतला असून आता भारतातही या विमानांच उत्पादन होतं.