Ad imageAd image

५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ आणि पवार घराण्याच राजकीय प्रवास

ratnakar
५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ आणि पवार घराण्याच राजकीय प्रवास
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sharad Pawar on Baramati Vidhansabha : महाविकास आघाडीने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना संधी देऊन अजित पवार यांच्याविरोधात त्यांच्याच सख्या पुतण्याला उभं केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका-पुतण्या लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. शेकडो कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि शरद पवारही बारामती कार्यालयात स्वतः हजर राहिले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ५७ वर्षांपूर्वीची आठवणही शेअर केली.

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा मी आढावा घेत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. त्याची नोंद अंतकरणात कायम राहील, आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व जागा लढत आहोत. तिघांच्यात एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करतोय. एकंदर जागांपैकी ९५ टक्के जागांवर एकमत झालं आहे. काही थोड्या जागा राहिल्या आहेत, त्यावर विचार करून निर्णय घेऊ. माझी खात्री आहे की जागा वाटपाची स्पष्टता एक दोन दिवसांत होईल. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. सरकारकडून ते सोडवले गेले नाहीत.

“महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की मविआच्या वतीने महाराष्ट्रात जनतेच्या हिताची जपणूक करणारा, महत्त्वाचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कामगार, दलित आदिवासी महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमची आघाडी करेल, असा विश्वास मी देतो. निवडणुकीचा फॉर्म भरण्याकरता आम्ही याठिकाणी आलो आहोत. मविआच्या वतीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं परदेशात उच्चशिक्षण झालंय. माझी खात्री आहे की बारामतीची जनता नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाला स्वीकारून मोठी शक्ती उभी करतील”, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.

शरद पवारांची प्रतिक्रिया
“मी स्वतः ५७ वर्षांपूर्वी बारामतीच्या तहसील कार्यालयात स्वतःचा फॉर्म भरायला आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिलं आहे. ५७ वर्षे एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनण्याची संधी दिली, त्याचं कारण जनतेशी असलेली बांधिलकी. नव्या पिढीच्या सर्वच उमेदवारांना माझा सल्ला आहे की जनतेशी बांधिलकी ठेवा. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने संधी दिल्यानंतर सातत्याने जागृत राहा”, असा मोलाचा सल्लाही शरद पवारांनी तरुण उमेदवारांना दिला आहे.

अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया काय?
“शरद पवार स्वतःचा फॉर्म भरायला बारामतीच्या कार्यालयात होते. त्यानंतर आता पहिल्यांदा ते माझा फॉर्म भरायला आले. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आज खरंतर मला बोलण्यासाठी शब्द उरले नाहीत. लहानपणापासून मी पवारांचं संपूर्ण करिअर पाहिलंय. ते नेहमी माझे मार्गदर्शक राहिले आहेत. गुरू राहिले आहेत. लहान असताना प्रत्येकाला रोल मॉडेल, आदर्श असतात. मी नेहमी शरद पवारांनाच आदर्श मानत आलो आहे. आज ते येथे माझा फॉर्म भरायला आले, हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article