बेळगाव : ८८९ वी बसव जयंतीनिमित्त महांतेश नगरमध्ये ११ व्या दिनी धर्म जागृती सद्भावना पदयात्रामध्ये नागनूरच्या रुद्राक्षी मठाचे परमपूज्य अल्लमप्रभु स्वामीजी यांच्या नेतृत्वामध्ये अंजनेय नगरातील सर्व ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली.
धर्म जागृती पदयात्रेमध्ये शिवानंद म्हास्वामीजी हंदीगुंद, डॉ. बसवानंद स्वामीजी, पूज्य ओम गुरुजी, कारंजी मठचे पूज्य शिवयोगी देव व इतर स्वामीजींच्या नेतृत्वामध्ये पदयात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर परमपूज्य अल्लमप्रभु स्वामीजींनी रुद्राक्ष घातले आणि महाप्रसादाला चालना दिली.
११ व्या दिनी पदयात्रेमध्ये बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके, नगरसेवक, राष्ट्रीय बसवसेना अध्यक्ष शंकर गुडस, राजु पद्मानावर, शिवनांद वागरवाडी, संजू मारडी, महालिंग तंगडगी, नगरसेवक राजशेखर डोनी, प्रमुख आणि बसवभक्तांच्या उपस्थितीत पदयात्रा यशस्वी झाली.