Ad imageAd image

अरे काय चाललंय काय! कामठीत आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

ratnakar
अरे काय चाललंय काय! कामठीत आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर : बदलापूर येथील शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यभर असंतोष व्यक्त करण्यात येत असून अशातच कामठी शहरातील एका ठिकाणी एका आठ वर्षीय बालिकेवर शेजारीच राहणाऱ्या ५० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दि.२२उघडकीस आली. याप्रकरणी आदेश धनीराम वासनिक (वय ५०) याला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारी रात्री घरी कुणीही नसल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कुणास सांगितला तर तुला ठार मारेन, अशी धमकी दिली. ती रडतरडत घरी गेली आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले व तक्रार नोंदविली. याप्रकरणी कामठी पोलिसात त्याच्याविरूद्धात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा तपास ठाणेदार प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मीना झाडे करत आहेत.

महाराष्ट्रात अशा घटना एकामागून एक घडत आहेत त्यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी अशी एक प्रत्रकार म्हणून मागणी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article